Women's Wing Haldi Kumkum

IMA womens wing ने यावर्षी प्रथमच एक आगळा वेगळा परंतु स्त्रियांमध्ये अत्यंत आपुलकीचा असा हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला. साधारण ५० महिला डॉक्टर्स नी १२ फेब्रुवारी सायंकाळी ४-६ दरम्यान IMA हॉल येथे धम्माल केली. कॉर्डीनेटर्स डॉ. कविता गाडेकर / डॉ. चेतना दहिवेलकर यांनी वेगवेगळे गेम्स घेऊन उपस्थितांना खिळवून ठेवले जसे उखाणा कॉम्पेटिशन १ मिनिटात गणपतीची नावे फुग्यावर लिहिणे इत्यादी. बेस्ट कॉस्ट्यूम , बेस्ट उखाणा अशी बक्षिसे विजेत्यांना IMA वूमन्स विंग च्या अध्यक्षा डॉ. सुषमा दुग्गड उपाध्यक्षा डॉ. वैशाली काळे यांच्या हस्ते देण्यात आली. यानंतर 'बाप ' या काळजाचा ठाव घेणाऱ्या विषयावर सौ अदिती वाघमारे यांच्या १५ मिनिटांच्या हृद्यस्पर्शी व्याखानाने उपस्तिताचें डोळे पाणावले डॉ राजश्री पाटील यांनी सौ. वाघमारे यांचा सत्कार करून आभार मानले तसेच उत्कृष्ट कार्यक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले . यावेळी सर्व महिला डॉक्टर्स नी एकमेकांना वाण देऊन हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Back
//