I Love you Jindagi

सर्वांना प्रतिक्षेत असलेला व अत्यंत उत्कांठावर्धक IMA नाशिक आयोजीत IMA चा सांस्कृतीक उत्सव Love You Zindagi २७ जानेवारी २०१९ ला सायंकाळी ६. ३० वाजल्यापासुन कालिदास कलामंदिर येथे रंगला. साधारण २ तास रंगलेला या कार्यक्रमात १८ डान्स परफॉर्मन्स नी (२ सोलो , ४ डुएट & १२ ग्रुप्स ) रसिकांना मंत्रमुग्ध केले . 'आला रे आला सिम्बा आला ' म्हणत डॉ मिलिंद भरडियांनी धडाकेबाज एन्ट्री करत दमदार परफॉर्मन्स दिवा डॉ तृप्ती देसलेच मेरे ढोलना सुन असो व डॉ वैशाली अग्रवाल / डॉ श्वेतल बोरा यांचे राधामीरा डुएट , डॉ तेजश्री पटेकर - डॉ मिनल भिरूड यांच क्लासिकल डुएट असो किंवा HMC ग्रुप चा फोल्क डान्स या नर्तिकांच्या मोहक अदांनी प्रेक्षक अगदी भारावुन गेले . स्वातंत्र्यवीर सावरकरांची छत्रपती शिवरायांवर केलेली आरती वेगळ्या पद्धतीने सादर करून डॉ शशांक कुलकर्णी व ग्रुप ने वन्स मोर मिळवला. Mrs. डॉ नितीन चिताळकरांच्या रोमँटिक डुएट ने संबंध वातावरणच रोमँटिक केले. रेडिओलॉजि ग्रुप चा switch gender , ऑप्थल्म ग्रुप चा गोविंदा मॅश अप , API लेडीस चा जागरण गोंधळ. डॉ विक्रांती - डॉ हेमांगिनी चा fusion ग्रुप च्या एकापेक्षा एक व युनिक डान्स परफॉर्मन्स नी रसिकांची मने जिंकली . IMA चे अध्यक्ष यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले . Coordinators डॉ. विद्या गोसावी, डॉ हेमंत सोननीस, डॉ. मिलिंद भराडीया यांनी हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले उत्तरोत्तर रंगलेल्या या सोहळ्यात प्रेक्षकांनी मनमुदाद आनंद लुटला .

Back
//